व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले   

ट्रम्प यांचा पुन्हा दावा

न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानने संघर्ष थांबविला नाही तर अमेरिकेसोबत होणारा दोन्ही देशांचा व्यापार बंद करु, अशी धमकी मी दिली होती. त्यामुळे  संभाव्य अणुयुद्ध टळले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला आहे.
 
गेल्या काही आठड्यांपासून ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष रोखण्यात आपली भूमिका होती. बंदुकीच्या गोळ्या झाडण्याऐवजी मी व्यापारावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला  दिला होता. त्यांनी दावा केला होता की, दोन्ही देश सर्वसाधारण पणे गोळ्यांचा वर्षाव करत होते. तेव्हा आम्ही व्यापारावर बोलत होतो. याबाबीचा  मला अभिमान आहे. संघर्षावेळी तेव्हा अशा विषयावर कोणीही बोलत नव्हते. आता संघर्षबंदी झाली आहे. आता सर्व काही छान झाले, असेही ते म्हणाले.
 
तसेच संघर्ष थांबविला नाहीत तर अमेरिकेसोबतचा व्यापार बंद केला जाईल, अशी धमकी दिली होती. दरम्यान, भारताने ट्रम्प यांचा दावा खोडून काढला होता लष्करी संघर्षावेळी भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या चर्चेत व्यापाराचा विषयच आला नव्हता, असे सांगितले होते.

Related Articles